22.3 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभेला मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

विधानसभेला मनसेचा ‘एकला चलो रे’चा नारा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभेत बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेसाठी मनसे २५० जागांची तयारी सुरू करणार असल्याची माहिती आहे. आज झालेल्या मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळाची लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

येत्या १५ दिवसांत मनसेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची चाचपणी करणार असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी मनसेकडून फायनल केली जाणार असल्याची चर्चा आहे. या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा न दिल्याने मनसेला मोठा फटका बसला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मनसेने चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. मनसेने विधानसभेसाठी २००-२५० जागांची तयारी सुरू केली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे राज्यातील २५० जागांची चाचपणी करणार आहे. त्यामुळे मनसे पुन्हा ‘एकला चलो रे’ या भूमिकेत दिसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, या आधी २०१४ आणि २०१९ विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडीने टाळी दिली होती. मात्र, अखेरच्या क्षणी पाठिंबा न दिल्याने मनसेला मोठा फटका बसला. त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचे बोलले जात आहे. मनसेने आज बैठक आयोजित केली होती यावेळी आगामी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR