25.2 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रशासनाची शेतक-यांच्या नावावर हजारो कोटींची लूट

शासनाची शेतक-यांच्या नावावर हजारो कोटींची लूट

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात आता असलेली सत्ता हटवणे हे महत्त्वाचे काम आहे. शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. शेतक-यांच्या नावाने हजारो कोटी रुपये खाण्याचे काम सरकार करत आहे. विकासाच्या नावाने राज्यातील सर्व संपत्ती गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेतले जाते. त्यातून मोठ्या प्रमाणावर लूट केली जाते. राज्याच्या जनतेला कर्जात बुडवून भाजप आणि त्यांचे सहकारी जनतेच्या पैशाची लूट करत आहेत. हे सर्व प्रश्न आम्ही येणा-या अधिवेशनात सभागृहात मांडू आणि सरकारकडे उत्तर मागू, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारसह भाजपवर टीका केली आहे.

पत्रकार परिषदेत नाना पटोले पुढे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे. जागावाटपाचा विषय जुलैच्या पंधरवड्यात किंवा शेवटच्या टप्प्यात संपला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आम्हाला सत्ता मिळेल की नाही, हा इश्यू नाही. केंद्रातील मोदी सरकार खालच्या पातळीवर जाऊन काम करतं. ते कुणाच्या कुटुंबाला तोडतील, पक्षाला तोडतील, परिवारात भांडणे लावतील. हे चित्र आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत एकजूट हाच पर्याय आहे, असे आम्हाला वाटते. भाजप सांगतोय, कुणी सांगतोय म्हणून आम्ही स्वबळावर लढायचं तसं नाही.

आमचे संघटनात्मक काम सुरूच
लोकसभेच्या ४८ जागांसाठी आम्ही संघटनेने तयारी केली होती. त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला. आम्हालाही त्याचा फायदा झाला. आमचे संघटनात्मक काम सुरू राहिलं आहे. भाजपशी निगडीत जे लोक आहेत, तिथे ओबीसींची अवहेलना होणारच आहे. भाजपच्या सानिध्यात जी लोकं आली, मग तो ओबीसीचा चेहरा असेल, त्यांना टार्गेट केले जाते. छगन भुजबळांना त्रास होतोय, हे लपून राहिलं नाही. ते अडीच वर्षे जेलमध्ये राहिले होते. त्याच भुजबळांना आता त्यांनी सोबत घेतले आहे. भाजपची ही गिरगीटसारखी पद्धत यातून स्पष्ट होते, असेही नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR