18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रआमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार

आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार

पुणे : मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे यांनी दिला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शब्द दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला चितपट केल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे घटक पक्षांकडून सांगितले जात आहे. पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. सरकारला मुदतवाढ दिली असली तरी, मनोज जरांगे यांनी आंदोलन सोडणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच शाहगड येथे कार्यालय सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करणार असल्याची गॅरंटी जयंत पाटील यांनी दिली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का? त्यांची मागणी प्रथम पाहावी. आमचे सरकार आले तर त्यांची मराठा आरक्षणाची मागणी पाहिली करून घेऊ, असा शब्द जयंत पाटील यांनी दिला. तसेच दोन आठवड्यांचा अधिवेशन करण्याची डाव दिसत आहे. भाषण सुरुवात आणि नंतर दोन दिवस आर्थिक बजेट मांडवे, असे आहे. अधिकचा आठवडा वाढावा ही विनंती आहे. अधिकाचे दिवस वाढवावे. न्याय मागण्यासाठी दिवस मिळावे. शेवटचे अधिवेशन आहे, त्यामुळे सगळ्यांना बोलण्याची संधी मिळावी, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.
दरम्यान, अण्णा हजारे बराच वेळ शांत होते. गेली अनेक वर्षे त्यांचे मौन होते. आता बोलत आहेत, हे आश्चर्य आहे. ते आता अजित पवार यांच्यावर का बोलतात? ते त्यांच्या सहका-यांनी शोधावे. त्या आरोपमध्ये आतापर्यंत काही मिळाले नाही. त्यांचा बोलावता धनी नक्की कोण? अशी विचारणा जयंत पाटील यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR