24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत आम्हीच मोठा भाऊ

महायुतीत आम्हीच मोठा भाऊ

शिरसाट यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुका संपताच राज्यातील राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जागावाटपावरून हेवेदावे सुरू झाले आहेत. याचदरम्यान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी एक विधान केले आहे. या विधानामुळे विधानसभेच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्याआधीच वादाचे ढोल वाजू लागले आहेत.

आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, त्यामुळे आम्ही मोठा भाऊ, असे विधान शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे. शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे महायुतीत जागावाटपावरून वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जातेय. विधानसभेत शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून जास्त जागांची मागणी केली जाणार आहे, यामुळे वाद होण्याची शक्यता आहे.
लोकसभेत शिवसेनेने १५ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ७ जागांवर त्यांनी विजय मिळवला. त्यानुसार

विधानसभेत शिवसेना अधिक जागांचा दावा करेल. शिवसेनेच्या या दाव्यामुळे विधानसभेचे बिगूल वाजण्याआधी महायुतीत वादाचे ढोल वाजू लागलेत.
ठाकरे यांनी लढविलेल्या जागा २२, आम्ही लढविलेल्या १५ आहेत. यात तुलना केली तर आमचा स्ट्राईक रेट चांगला असून तो ४६ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR