28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरमहापालिकेत १४७ अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान

महापालिकेत १४७ अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेत मेगाभरती झाली आहे. पहिल्या टप्प्यात विविध संवर्गातील १४७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यामध्ये अग्निशामक, महिला बालकल्याण, पशुवैद्यकीय, पर्यावरण अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

महापालिकेच्या विविध विभागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. टीसीएस कंपनीच्या मध्यमातून ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. ३८६ अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जाची, उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. या दोन दिवसांत ३८६ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. चार नियंत्रण अधिकारी आणि १२ पथके कार्यरत होते. सहायक आयुक्त शशिकांत भोसले, ज्योती भगत, गिरीश पंडित, अंतर्गत लेखापरिक्षक राहुल कुलकर्णी यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल यांनी नियोजन केले होते.

महापालिकेच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने छाननी करण्यात आली. दुसरी बेटिंगलिस्टदेखील लवकर जाहीर करुन नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी, सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मण दॉतुल आदी उपस्थित होते.पर्यावरण संवर्धन अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, जीवशात्रज्ञ, महिला बालकल्याण अधिकारी, कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर, कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक प्रयोगशाळा असिस्टंट, प्रयोगशाळा टेक्निशियन, क्लार्क ७०, १९ स्टेनो, अग्निशामक दल अधिकारी.या पदांची भरती झाली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR