28.7 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरण; बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा

पुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरण; बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा

पुणे : पुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपींना जामीन देण्याच्या संदर्भात बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांच्या अहवालात त्रुटी सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना येत्या चार ते पाच दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे.

पुण्यातील कल्याणीनगर येथे एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कारने एका मोटारसायकलला धडक दिल्याने दोन आयटी व्यावसायिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बाल न्याय मंडळाने रस्ता सुरक्षेवर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यासह अत्यंत सौम्य अटींवर आरोपीला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर देशभरातून यावर संताप व्यक्त करण्यात येत होता. १९ मे रोजी बाल हक्क न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला होता. हा जामीन मंजूर करताना सादर केलेल्या अहवालात गंभीर त्रृटी आढळल्या होत्या. यामध्ये जामीन मंजूर करण्याचा आदेश एका सदस्याने जारी केला होता तर त्यावर सही दुस-या सदस्याने केली होती.

दोन सदस्यांकडून गैरवर्तन आणि नियम मोडले असल्याचे आढळून आले आहे आणि त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले. महिला व बाल विकास विभागाने नेमलेल्या समितीने यापूर्वीच दोन बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या दोन सदस्यांची चौकशी करण्याचे काम या पाच सदस्यीय पथकाला देण्यात आले होते. बाल न्याय मंडळामध्ये महिला व बाल विकास विभागाद्वारे नियुक्त केलेले दोन सदस्य आणि न्यायव्यवस्थेतील एका सदस्याचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR