26.1 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये गंगेत नाव उलटली, सहाजण बेपत्ता

बिहारमध्ये गंगेत नाव उलटली, सहाजण बेपत्ता

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे गंगा दस-याच्या मुहूर्तावर मोठी दुर्घटना घडली. गंगा दस-यानिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांची बोट पाटणा येथील पूरपरिसरात उलटली. मिळालेल्या माहितीनुसार, पूरक्षेत्रातील उमानध घाटाजवळ ही दुर्घटना घडली. या बोटीत १७ जण होते.

बोट उलटताच ११ जण पोहत बाहेर आले, मात्र ६ जण बेपत्ता आहेत. पोहायला येत नसल्याने त्याला पाण्यातून बाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गोताखोर सर्व बेपत्ता लोकांचा शोधात गुंतले आहेत, मात्र अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान, घटनास्थळी एसडीआरएफच्या टीमसह प्रशासनाचे अधिकारीही पोहोचले असून, बचाव कार्य सूरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR