19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयबायजूविरुद्ध तपासणीत ईडीला आढळली ९ हजार कोटींची अनियमितता

बायजूविरुद्ध तपासणीत ईडीला आढळली ९ हजार कोटींची अनियमितता

नवी दिल्ली : ईडीने बायजूला विदेशी निधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ९ हजार कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. बायजूविरुद्ध तपासणीत ईडीला ९ हजार कोटी रुपयांची अनियमितता आढळली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, ईडीने बायजूशी संबंधित परिसराची झडती घेतली होती. कंपनी बायजू नावाने एक लोकप्रिय ऑनलाइन एज्युकेशन पोर्टल चालवते. शोध आणि जप्तीच्या कारवाईदरम्यान अनेक कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे.

कंपनीला २०११ ते २०२३ या कालावधीत २८००० कोटी रुपयांची (अंदाजे) थेट परकीय गुंतवणूक मिळाल्याचेही छाप्यांमध्ये उघड झाले आहे. याशिवाय, कंपनीने याच कालावधीत थेट विदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली ९७५४ कोटी रुपये (अंदाजे) विदेशात पाठवले आहेत. कंपनीने जाहिरात आणि विपणन खर्चाच्या नावावर अंदाजे ९४४ कोटी रुपये गोळा केले आहेत, ज्यात परदेशात पाठवलेल्या पैशांचाही समावेश आहे.

कंपनीने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आपली आर्थिक विवरणपत्रे तयार केलेली नाहीत आणि खात्यांचे ऑडिट केलेले नाही, जे आवश्यक होते. त्यामुळे बँकांकडून कंपनीने दिलेल्या डेटाची खरी पडताळणी केली जात आहे. अनेक खासगी व्यक्तींकडून आलेल्या तक्रारींच्या आधारे बायजूविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली होती. ईडीने केलेल्या तपासादरम्यान संस्थापक आणि सीईओ रवींद्रन बायजू यांना अनेक समन्स बजावण्यात आले होते. मात्र, तो नेहमी टाळाटाळ करत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR