28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरलातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरूवात

लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला उद्यापासून सुरूवात

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) व पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२०२३ लातूर जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची ३९, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) यांची ०५ व पोलीस शिपाई चालक यांची २० अशा एकुण ६४ पदाची भरती २०२२-२०२३ करिता दिनांक ०१ मार्च २०२४ रोजी स्थानिक वृत्तमान पत्रात  तसेच लातूर जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली होती. या ६४ पोलीस शिपाई पद भरती प्रक्रियेला प्रत्यक्षात उद्यापासून सुरूवात होणार असून यासाठी उमेदवारांना पहाटे चार वाजताच बाभळगाव रोडवरील पोलीस मुख्यालय येथे हजर रहावे लागणार आहे.
महाराष्ट्र शासनाने महाआयटी यांचे मार्फत पोलीस भरती सन २०२२-२०२३ चे अनुषंगाने दि.५ मार्च २०२४ ते दि.१५ एप्रील२०२४ या कालावधीमध्ये उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावयाची सुविधा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती. लातूर जिल्हा पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) व पोलीस शिपाई चालक भरती २०२२-२०२३ ची जाहिरातीमध्ये नमुद प्रमाणे प्रवर्गनिहाय एकुण (६४) रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी ही उद्या दिनांक १९ जून रोजी सकाळी ०५.०० वाजता पासून पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे होणार आहे. संबंधीत उमेदवारांना महाआयटी यांचेकडुन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सदर प्रवेशपत्रावर उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी, शारिरीक मोजमाप व शारिरीक चाचणीस कोणत्या तारखेस हजर रहावयाचे आहे याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवारांना प्रवेशपत्रावर देण्यात आलेल्या तारखेस पोलीस मुख्यालय, लातूर येथे पोलीस भरती प्रक्रियेसाठी हजर रहायचे आहे. उमेदवार दिलेल्या तारखेस पोलीस भरतीच्या कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीस उपस्थित न राहिल्यास त्यांना नंतर संधी देण्यात येणार नाही.
परंतु जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर त्यांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाणार आहे. काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची सुचना प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाणार आहे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदाणी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुस-या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. उमेदवारांनी त्यांना अशी दुसरी तारीख मिळणेसाठीचा विनंती अर्ज या कार्यालयाचे संकेतस्थळावर अथवा पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे सादर करावयाचा आहे. उमेदवारांना अडचण / शंका असल्यास त्यांनी १ं४ल्लं‘.२ं१ा@ेंँं्र३.ङ्म१ॅ या वर ई-मेल करावा. तसेच काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्याचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल.
उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी, शारिरिक मोजमाप व शारिरिक चाचणी करिता सोबत आणावयाचे साहित्य, कागदपत्राची माहिती तसेच सुचना याबाबतची सविस्तर माहिती या कार्यालयाचे संकेतस्थळ वरती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच लातूर जिल्हा पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (बॅण्डस्मॅन) व पोलीस शिपाई चालक भरती-२०२२-२०२३ प्रक्रियेमध्ये उमेदवारांचा काही आक्षेपकिंवा तक्रार असल्यास त्यांनी दुरध्वनी क्रमांक ०२३८२-२४२२९६ वरती तसेच या कार्यालयाचे २स्र.’ं३४१@ेंँंस्रङ्म’्रूी.ॅङ्म५.्रल्ल ई-मेल आयडी वर सविस्तर आक्षेप नोंदविण्यात यावा असे कळविण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR