25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रवायव्य मुंबईच्या मतमोजणीचे गूढ वाढले

वायव्य मुंबईच्या मतमोजणीचे गूढ वाढले

मुंबई : (प्रतिनिधी) उत्तर पश्चिम मुुंबई लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत प्रचंड मोठी हेराफेरी झाली आहे. या मतदारसंघातल्या ५६० मतांचा हिशोबच लागत नाहीय. मतमोजणी केद्रात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांच्यावरील मोबाईल फोनवरून कोणाला फोन केले जात होते ? तो मोबाईल कुठे आहे ? दहा दिवसांनंतर त्यांच्यावर गुन्हा का दखल केला ? असे प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी आज उपस्थित केले. याबाबतची सर्व माहिती आमच्याकडे आली असून योग्यवेळी उघड करणार, असल्याचा इशाराही परब यांनी यावेळी दिला.

उत्तर पश्चिम मुुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रंिवद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा अवघा ४८ मतनी पराभव केला आहे. मतमोजणीच्या दिवशीही तिथे बराच गोंधळ झाला व अजूनही त्यातील सुरस कथा बाहेर येत आहेत. यासंदर्भात रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला होता. ईव्हीएम ही एक स्वतंत्र प्रणाली असलेली यंत्रणा असून ती कोणत्याही मोबाईलकिंवा अन्य कुठल्याच नेटवर्कला जोडलेली नसते. मतमोजणी केंद्रावर निवडणुक संबंधी डाटा एन्ट्रीसाठी इनकोअर प्रणालीत माहिती भरण्यासाठी काही अधिकाठयांना मोबाइल वापरण्याची परवानगी दिली जाते.

जोगेश्वरीत दिनेश गुरव हा डाटा एन्ट्रीचे काम करणाठया अधिकाठयाचा फोन पंडिलकर यांनी वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, मतमोजणीशी या मोबाईलचा संबंध नाही, असेही सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले. सोमवारी शिवसेना भवन येथे शिवसेना नेते (ठाकरे), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना नेते ऍड. अनिल परब यांनी सुर्यवंशी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना आक्षेप घेतला.

निवडणूक निर्णय अधिकाठयांचा पूर्वइतिहास सांगतानाच त्यांच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत, कोणकोणत्या प्रकरणात त्यांना निलंबित केले आहे, भ्रष्टाचाराची किती प्रकरणे सरकारकडे प्रलंबित आहेत, हे सर्व यानिमित्ताने तपासून पाहिले पाहिजे, अशी मागणी परब यांनी केली. पोलीस अधिकाठयांनी देखील ज्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करीत आहे कि नाही हे पाहत असून ते एकमेकांवर ढकलण्याचे काम करीत आहेत. कदाचित सरकारने त्यांना सांगितले असेल कि काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही, त्यामुळे ते कदाचित असे कृत्य करीत असतील, अशी टिकाही त्यांनी केली. परंतु निवडणूक आयोगाने स्वत:हून यामध्ये लक्ष घालून याची चौकशी केली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी करतानाच लवकरच आम्ही न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहितीही परब यांनी दिली.

निवडणूक आयोगाने योग्य कारवाई करावी! – आदित्य ठाकरे
लोकशाहीचा सण आपण ज्याला म्हणतो ती लोकसभेची निवडणूक पारदर्शपणे झाली काय, असा सवाल करत आता खठया लढाईला सुरुवात झाली आहे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली. भाजपाने लोकसभेच्या विजयावर जो दावा केला आहे तो २४० वर आलेला आहे. मात्र, भाजपाच्या हातात निवडणूक यंत्रणा नसती आणि निवडणूक मोकळ्या वातावरणात पार पडली असती तर भाजपाच्या २४० काय ४० जागा पण आल्या नसत्या, अशी टिका आदित्य ठाकरे यांनी केली.

भाजपाने ज्या काही जागा मिळविलेल्या आहेत त्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळविल्या आहेत, असा आरोप करत निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य ती पावले उचलून कारवाई करावी, अन्यथा आम्ही कायदेशीर लढा देऊन, त्याचा पाठपुरावा करून उत्तर पश्चिम मुंबईचा हा विजय ंिजकणारच, ती जागा घेणाराच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर पश्चिम मुंबईची जागा आम्हीच ंिजकलेलो आहोत. ती जागा आमच्या हक्काची आहे. मुंबईकरांनी हुवूष्ठमशाहीविरोधात निकाल दिलेला असून या निकालात जी गडबड झाली आहे त्यासंदर्भात तांत्रिक गोष्टी समोर आणल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR