माहूर : शेतात स्पिंकलरचे पाईप गोळा करीत असताना अचानक वीज अंगावर पडून नांदेड जिल्हातील माहुर तालूक्यातील शेख फरीद वझरा येथील तरुण शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना सोमवार सायंकाळी ५ वाजता घडली.
माहूरपासून १५ किमी अंतरावरील शेख फरीद वझरा येथील तरुण शेतकरी आनंद तुकाराम मुंडे वय १८ हा आपल्या शेतात स्पिंकलर गोळा करीत होता.सोमवारी सायंकाळी जोरदार वारा व विजेचा कडकडाट होऊन वीज अंगावर कोसळली यात त्याचा दुदैर्वी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तलाठी ए.वी. कुडमेथे व माहूर पोलिस ठाण्याचे जमादार बाबू जाधव, दत्त मांजरी येथील पोलिस पाटील रितेश केंद्रे, यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला,
यावेळी सरपंच दीपक केंद्रे, हरीश मुंडे, हनुमंत मुंडे, सुनील फड, प्रभू चोले, बालाजी केंद्र या गावक-यांच्या मदतीने प्रेत माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात शोविच्छेदनासाठी आणण्यात आले. आनंद तुकाराम मुंडे वय १८ यांच्या दुदैर्वी निधनाने शेख फरीद वझरा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. माहूर तालुक्यात सोमवारी सायंकाळी मेघ गरजेनेसह काही ठिकाणी तुरळत तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली.