मुंबई : दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन तुकारम मुंडे यांची बदली करण्यात आली. विकास आयुक्त, असंघटित कामगार या कमी महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली. अप्पर मु्ख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंडे यांना बदलीचे पत्र दिले आहे. तुकाराम मुंडे यांच्या पदाचा कारभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
तुकाराम मुंडे हे २००५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते त्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणतात, कारण त्यांच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची २० वेळा बदली झाली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना या बदल्यांना सामोरे जावे लागल्याचे मानले जाते.