27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeसोलापूरजिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीनेच होणार

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीनेच होणार

सोलापूर : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी ऑनलाइन बदली धोरण शासनाने जाहीर केले असून, त्याचे आम्ही राज्यातील शिक्षकांच्या वतीनेस्वागत करतो. ऑनलाइन बदली धोरणातून राज्यातील शिक्षकांच्या बदल्या एकही रुपया न खर्च करता, भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक पद्धतीने होऊन वशिला नसणाऱ्या व दुर्गम क्षेत्रात वर्षांनुवर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळेल.असे शिक्षक सहकार संघटनेचे सरचिटणीस नीलेश देशमुख यांनी सांगीतले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. यासंदर्भातील धोरण शासनाने नुकतेच जाहीर केले आहे. या निर्णयाचे शिक्षक सहकार संघटनेने स्वागत केले असून, नवीन नियुक्त शिक्षकांच्या समावेशासह आंतरजिल्हा बदलीचेही धोरण शासनाने जाहीर करावे, असे शिक्षक सहकार संघटनेने म्हटले आहे.

शिक्षण विभागाच्या २१ जून २०२३ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांना खीळ बसली होती. शासनाने जिल्हा परिषद पातळीवर या बदल्या ऑफलाइन पद्धतीने चालू केल्या होत्या. या निर्णयाविरुद्ध शिक्षक सहकार संघटनेने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून १० दिवसांत १० हजार शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या व १५ आमदारांची पाठिंब्याची पत्रे जमा करून शासनाकडे ऑनलाइन बदल्या करण्याची मागणी केली होती.

यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी मुंडन आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. वर्षभराच्या सतत केलेल्या पाठपुराव्याला १८जूनच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाने यश आले असून, राज्य शासनाने पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करून १८ जूनच्या निर्णयानुसार शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या शासनाने ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्यातील अवघड घोषित करतील, शाळानिहाय रिक्त पदे घोषित करतील, समानीकरणाचा जागा रिक्त ठेवणे शिक्षकांकडून पसंती क्रमांक घेणे,संगणकीकरणाने ऑनलाइन बदल्या करण्यात येतील. विस्थापित शिक्षकांसाठी विशेष टप्पा राबविण्यात येईल. अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठीचा टप्पा राबविण्यात येईल.

जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करतील.अशी बदल्यांची कार्यपध्दती राहील.
यात बदल्यांसाठी पूर्वीप्रमाणे अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र असणार आहे. बदलीसाठी ३१ मेपर्यंतची सेवा ग्रा धरण्यात येणार आहे. या बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग शिक्षक भाग १, विशेष संवर्ग शिक्षक भाग २, बदलीस पात्र शिक्षक असे संवर्ग असतील. विशेष संवर्गातर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकास पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. विशेष सेवा संवर्ग भाग २ अंतर्गत लाभ घेणारे दोन्ही कर्मचारी एकाच जिल्ह्यात कार्यरत असणे आवश्यक आहे. बदलीस पात्र होण्यासाठी सलग १० वर्षे व विद्यमान शाळेवर पाच वर्षे सेवा झालेली असावी लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR