28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरछत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता निकृष्ट

छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक रस्ता निकृष्ट

सोलापूर : महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी दोन कोटी रुपये खर्चुन छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याचे डांबरीकरण केले. या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत. ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर आला आहे.

छत्रपती संभाजी महाराज चौक हे शहराचे प्रवेशद्वार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे केलेले काम निकृष्ट ठरले होते. त्यानंतर हा रस्ता मनपाकडे वर्ग झाला. गेली दीड वर्षे या रस्त्याची अवस्था दयनीय होती. अनेक संघटनांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदने दिली.

महापालिकेने राष्ट्रीय स्वच्छ वायू वाहन योजनेतून दोन कोटींची निविदा काढली. आता या रस्त्यावर पाच ठिकाणी खड्डे पडले आहेत. चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही . नगर अभियंता कार्यालयाने नुकतेच या रस्त्याची पाहणी केली. या भागातील जलवाहिनीला गळती लागली. नुकताच पाऊसही झाला. पाणी साठून रस्त्यावर खड्डे पडले. यासंदर्भात झोन अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच रस्त्याची दुरुस्ती होईल.असे मनपा रस्ते विभाग प्रमुख प्रकाश दिवाणजी यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR