28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeपरभणीपरभणीत एकदिवसीय करविषयक परीसंवादाचे आयोजन

परभणीत एकदिवसीय करविषयक परीसंवादाचे आयोजन

परभणी : जीएसटी कायद्याला लागू होवून ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभुमीवर परभणी शहरात दि.२२ जून रोजी एकदिवसीय करविषयक उत्कर्ष परिसंवाद २०२४चे आयोजन करण्यात आले आहे. हा परीसंवाद हॉटेल फर्न, एमआयडीसी परभणी येथे सकाळी ९ ते दुपारी सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे.

या परीसंवादास मुख्य अतिथी म्हणून सहायक राज्यकर आयुक्त धनंजय देशमुख, सन्मानीय अतिथी म्हणून जी़ एस़ टी़ पी़ एम़ चे राज्य अध्यक्ष अ‍ॅड.प्रविण शिंदे, ऑल इंडीया टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनचे वेस्टर्न झोनचे सहसचिव राजकुमार भांबरे, एनएमटीपीएचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीसनर असोसिएशनचे प्रसाद देशपांडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या परीसंवादात अ‍ॅड. सुभाष इंगळे, अ‍ॅड. सतिष जाजू, ओमप्रकाश शुक्ला, जगदीश मुंदडा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या परीसंवादात सांगलीचे अ‍ॅड. अमोल माने, छत्रपती संभाजीनगरचे सीए शुभम राठी, पुणे येथील सीए अभिजीत डोणगावकर हे आयकर, वस्तू व सेवाकर या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या परिसंवादास हिंगोली, नाशिक, नांदेड, मुंबई, रत्नागिरी, ठाणे येथील करसल्लागारांनी नोंदणी केली असून ते या परीसंवादात सहभागी होणार आहेत.

या परीसंवादाचे आयोजन जी़ एस़ टी़ पी़ एम़ मुंबई, करसल्लागार संघटना परभणी आणि सी़ पी. ़ई़ चॅप्टर परभणी, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशन, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशन, हिंगोली कर सल्लागार संघटना, नाशिक कर सल्लागार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे़ परभणी शहरातील या परीसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन सी़ पी़ ई़ चॅप्टरचे कनव्हेनर सीए व्यंकटेश पांपटवार, सीए रोहीत मंत्री, सीए दशरथ भालके, सीए शाम धूत, सीए संतोष इंगळे, करसल्लागार संघटनेचे अध्यक्ष सीए अरूणकुमार ओझा, निलेश शर्मा, गोविंद भंडारी, मनोज घोडके, नितीन शिंदे, राजकुमार भांबरे आदिंनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR