28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरआमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा

आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा

निलंगा : प्रतिनिधी
माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार निलंगेकर यांना वाढदिवसानिमित्त अभीष्टंिचंतन करण्यासाठी जनसेवा कार्यालयात लातूर जिल्ह्यासह निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरूर आनंतपाळ तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शासकीय अधिकारी व चाहत्यांनी गर्दी करीत नेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत अभीष्टंिचतन केले.
       वाढदिवसानिमित्त आमदार निलंगेकर यांच्या मातोश्री माजी खासदार रूपाताई पाटील व बहीण प्राजक्ता यांनी त्यांचे ओवाळून औक्षण केले. यावेळी रोहित पाटील, राजवीर निलंगेकर, डॉ लालासाहेब देशमुख हे उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त सकाळी शहरातील ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात अभिषेक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण कर्मयोगी स्व डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन, दादा पीर दर्गा व पीरपाशा दर्गा चादर चढवणे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण, हुतात्मा स्मारक येथे पुष्प अर्पण,  निलंगा उपजिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर व फळ वाटप करण्यात आले. तालुक्यातील अनेक शाळांत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्ष लागवड, मागासवर्गीय वस्तीगृहात विद्यार्थ्यांना फळ वाटप, भिलवस्तीमध्ये महिलांसाठी आरोग्य शिबिर, जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदीसह विविध सामाजिक उपक्रम निलंगा तालुक्यातील अनेक गावात राबवून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी आमदार निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ६५ लाखांची स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत मुदत ठेव  ( एफडी ) ठेवून वेगळा आदर्श निर्माण केला .
यावेळी निलंगा बाजार समितीचे सभापती विजयकुमारचिंचनसुरे, औराद बाजार समितीचे सभापती नरंिसंग, बिरादार, उपसभापती लालासाहेब देशमुख उपसभापती शाहूराज थेटे, शासकीय ठेकेदार एन. आर. काळे, सचिव संतोष पाटील, सचिव सतीश मारगणे, खरेदी विक्री संघाचे मुख्य प्रशासक सत्यवान धुमाळ, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरंिसंह भिकाने, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष अमित पटेल, जिल्हा संघटक सरचिटणीस तानाजी बिरादार, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंंगाडे, बाजार समितीचे संचालक, बंकट बिरादार, संजय दोरवे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, उपसरपंच वाघजी पाटील, सिद्धेश्वर बिरादार बसपुरकर, बालाजी मोरे, धोंडीराम चव्हाण, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके, तालुकाध्यक्ष संजय कदम, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम एम जाधव, विनोद सोनवणे, सुमित इनानी, किशोर लंगोटे, शरद पेटकर , वीरभद्र स्वामी, सुधाकर चव्हाण, वैभव पाटील, रमेश थेटे, राजप्पा लातूरे, सुधाकर शेटगार , रजाक रक्साळे, ज्ञानदेव धुमाळ, व्यंकट गिरी, सुरेश बिरादार, विलास भंडारे, सतीश सगरे, उमाकांत टेंकाळे, शाहूराज पाटील, दत्ता मोहोळकर, तम्मा माडीबोने यांच्यासह लातूर जिल्ह्याातील व निलंगा मतदारसंघातील निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते, बाजार समितीचे संचालक, सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी  व निलंगेकर यांच्या चाहत्यांनी जनसेवा कार्यालयात गर्दी करीत अभीष्टंिचंतन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR