27.3 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeसोलापूरकांदा,लसूण महागल्याने गृहिणींच्या किचनचे बजेट साफ कोलमडले

कांदा,लसूण महागल्याने गृहिणींच्या किचनचे बजेट साफ कोलमडले

सोलापूर : पावसाळ्यात अनेकांना चमचमीत, लज्जतदार खाण्याची हौस असते. मात्र वरण असो वा भाजी, याला लसणाची खमंग फोडणी दिल्याशिवाय पर्याय नसतो. परंतु हाच लसूण आता २४० पार झाल्याने गृहिणींच्या किचनचे बजेट साफ कोलमडले आहे. मध्यंतरी कांदे आणि यानंतर टोमॅटो, कोथिंबीर यांचे भाव आभाळाला भिडले होते त्यातून जरा कठे सुटका होईल असं वाटत असतानाच लसणाचे भाव पुन्हा कडाडले. लसूण हा अत्यंत गुणकारी वाणि जेवणाची लज्जत वाढविणारा जिन्नस असून त्याशिवाय जेवण अपूर्ण असते.

एखाद्यावेळी टोमॅटो खरेदी केले नाही तरी चालते पण फोडणीसाठी लसूण, आले, कांदा पाहिजेच आणि फोडणीशिवाय शेवटी भाजीही अळणीच, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिली आहे. मान्सूनच्या काळात चांगला पाऊस झाला नाही. लसणाचे पीक कमी झाले. तर, दुसरीकडे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस आल्यामुळे काही ठिकाणांवरील लसणाचे पीक उदध्वस्त झाले.

घाऊक बाजारात कांद्याची ६० रुपये दराप्रमाणे विक्री होत आहे.किरकोळ बाजारात लसूण २०० ते २४० किलोने विकला जात आहे.
यंदा नोव्हेंबरपासून जिल्ह्यात वादळासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यात गारपीटही झाल्याने कांदा भिजला व सडल्याने फेकावा लागला. त्यामुळे आवक कमी झाल्याने भाव वाढले आहेत.
लसणाची लागवड जिल्ह्यात फार कमी आहे. मागील वर्षी लसणाचे अधिक उत्पादन झाल्याने लसणाचे भाव ‘तळा’ला गेले होते. १०० रुपयाला दोन किलो लसूण विकला जात होता. पाऊस कमी झाल्याने लसणाचे लागवड क्षेत्रही घटले आहे.बहुतांश लसूण हा मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि हिमाचल प्रदेश येथून येतो.

महाराष्ट्रात त्यामानाने फारच कमी प्रमाणात लसणाचे उत्पादन होते. कांदा आणि लसणाची आवक कमी असल्याने भाव वाढले. त्यामुळे नवीन लसूण व कांदा बाजारात येईपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.कांदा, लसूण रोजच्या स्वयंपाकातला महत्त्वाचा घटक आहे. मध्यंतरी टोमॅटो आणि कोथिंबीर यांचे भाव आभाळाला भिडले होते त्यातून जरा कुठे सुटका होईल असं वाटत असतानाच लसणाचे भाव कडाडले म्हणून भाजी अळणीच करावी लागत आहे.असे गृहिणींनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR