28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्र‘मातोश्री’बाहेर झळकले लंकेंच्या स्वागताचे बॅनर 

‘मातोश्री’बाहेर झळकले लंकेंच्या स्वागताचे बॅनर 

मुंबई : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेणार आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’बाहेर निलेश लंकेंच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके यांच्यात लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव केला. निलेश लंके यांच्या विजयानंतर ते आज पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

उद्धव ठाकरेंना भेटणे माझ्यासाठी आनंदाचा क्षण : निलेश लंके
निलेश लंके यांच्या प्रचारात शिवसेना ठाकरे गटाचा मोठा वाटा होता. त्यामुळे आज नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांसोबत ‘मातोश्री’वर जाऊन लंके उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. लोकसभेचे निकाल लागल्यानंतर राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आज त्यांच्या भेटीसाठी निलेश लंके मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटणे हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो, अशी भावना निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे.

बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
निलेश लंके ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला येणार असल्याने त्यांच्या समर्थकांकडून स्वागताचे बॅनर ‘मातोश्री’च्या बाहेर लावण्यात आले आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून निलेश लंके यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR