19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रपाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

पाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई : राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा शासन निर्णय मंगळवारी कृषी व पदुम विभागाकडून जारी करण्यात आला. त्यानुसार राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे.

दरम्यान, मी या पदाचा वापर शेतक-यांच्या हितासाठी करणार आहे. दिल्लीत शेतीविषयक मते मांडण्यासाठी योग्य पद हाती असायला हवे, अशी शेतीतज्ज्ञांची भूमिका होती. त्यामुळे दिल्लीत शेतक-यांच्या समस्यांसाठी भांडू शकतो. महायुतीने माझ्यावर विश्वास टाकल्याने मी आभारी आहे, असे पाशा पटेल म्हणाले. २०१७ मध्ये त्यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR