25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeक्रीडाभाजप आमदाराची ऑलिम्पिक वारी

भाजप आमदाराची ऑलिम्पिक वारी

पाटणा : वृत्तसंस्था
बिहारमधील भाजप आमदार श्रेयसी सिंह यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. नेमबाज श्रेयसी सिंह ऑलिम्पिकमध्ये भारताची शान वाढवण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलम्पिक २०२४ मध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत श्रेयसी सिंह यांची निवड झाली. १७ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर श्रेयसी हिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली. कॉमनवेल्थ आणि आशियाई स्पर्धेत श्रेयसीने पदकावर नाव कोरले आहे. अर्जुन पुरस्काराने तिला नामांकितही करÞण्यात आले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी पहिली बिहारी आहे.

बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहे. २९ ऑगस्ट १९९१ मध्ये नवी दिल्लीत तिचा जन्म झाला. शूटर श्रेयसी या बिहारमधील राजघराण्यातील सदस्य आहेत. श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे. आता त्यांची पॅरिस येथील ऑलिम्पिक स्पर्धेत शॉटगन ट्रॅप महिला स्पर्धेसाठी निवड झाली. श्रेयसी सिंह यांनी २०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते. २०१४ मध्येच शगुन चौधरी आणि वर्षा वर्मन यांच्यासोबत इंचॉन येथील २-०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तसेच २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत डबल ट्रॅप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यांना २०१८ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR