27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeनांदेडनीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा

नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा

नीट पेपरफुटीचे लातूर कनेक्शन, २ शिक्षक अटकेत

नांदेड : प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. नीट पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. त्यानंतर दुस-याच दिवशी सीबीआयने एफआयआर दाखल केला. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शन समोर आले होते. आता महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन समोर आले आहे. कारण नीट पेपरफुटीप्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसने ताब्यात घेतले असून, त्यापैकी एक शिक्षक लातूरमधील तर दुसरा सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

ताब्यात घेण्यात आलेले दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान, नांदेड एटीएसकडून दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीअंती आता सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आला. केंद्र सरकारने शनिवारी रात्री नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआयला तपास करण्यासाठी दिले होते. नुकताच या प्रकरणी आता सीबीआय कडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचले आहेत.

नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नावे आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यावरून सध्या धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का, या दृष्टीने तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. दोघांनाही तात्काळ एटीएसकडून ताब्यात घेण्यात आले. परिणामी आज केलेल्या चौकशीअंती सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR