25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeधाराशिवधाराशीवच्या बेंबळी येथील शिक्षकाची ४६ लाखांनी ऑनलाईन फसवणूक

धाराशीवच्या बेंबळी येथील शिक्षकाची ४६ लाखांनी ऑनलाईन फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे कार्यरत असलेल्या एका शिक्षकाची एका भामट्याने ४५ लाख ९० हजार १०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. त्यांना भारत देशात शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करायची असल्याने त्यांच्या कडील यूएस डॉलर पाठविले आहेत. ते भारतात सोडवून घेण्यासाठी वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाखाली शिक्षकाकडून पैसे उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव येथील सायबर पोलिस ठाणे येथे दि. २४ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फेसबुक अकाऊंटला इलिझाबेथ जेरॉर्ड नाव असलेल्या आरोपीने ७०३९३४४१८६ या मोबाईल नंबरवरून बेंबळी येथील शिक्षकाला संपर्क साधला. इंडिया ओव्हरसीएस बॅक खाते, आयसीआयसीआय बॅक खाते व कॅनरा बॅक खाते अशा वेगवेगळ्या खात्यावर शिक्षकाकडून रक्कम घेतली. त्यांना भारतात शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणूक करावयाची आहे, त्यासाठी त्यांचे कडील युएस डॉलर पाठविले आहेत. ते भारतात सोडवून घेण्यासाठी वेगवेगळ््या टॅक्सच्या नावाखाली दि. २९ फेब्रुवारी २०२४ ते १६ जून २०२४ या कालावधीत ४५ लाख ९० हजार १०० रूपये शिक्षकाकडून ऑनलाईन घेतली.

त्या शिक्षकाची आर्थिक फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून दि. २४ जून रोजी धाराशिव येथील सायबर पोलिस ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम ४२०, सह माहिती तंत्रज्ञान सुधारीत अधिनियम २००८ कलम ६६ सी, ६६ डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR