26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यातील पब, बारवर पालिकेचा बुलडोझर!

पुण्यातील पब, बारवर पालिकेचा बुलडोझर!

पुणे : प्रतिनिधी
सांस्कृतिक राजधानी पुण्यात वारंवार अंमलीपदार्थांचे उघड सेवन, विक्री वाढत चालल्याचे उघडकीस आले आहे. नुकताच पुण्यातील एफसी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना उघडपणे ड्रग्ज पुरविले जात असल्याचा व्हिडीओ कॉँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्हायरल केला होता. विद्येचे माहेरघर पुणे उडता पंजाब झाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी या प्रकरणात अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे महानगर पालिकेच्या तोडक पथकाने मंगळवारी फर्ग्युसन रोडवरील बारवर जोरदार तोडकाम कारवाई सुरु केली. या कारवाईमुळे आता राज्य सरकारही उत्तर प्रदेशातील योगी आदित्य यांचा बुलडोझर कित्ता गिरविते की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर बुडडोझर कारवाई सुरु झाली आहे. या प्रकरणात पहिला व्हिडीओ व्हायरल करुन वाचा फोडणारे कॉंग्रेसचे पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या कारवाईला दिखाऊ कारवाई म्हटले आहे. अधिवेशन दोन दिवसांवर आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ श्ािंदे यांनी बारवार कारवाई सुरु केली असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR