28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयसुनीता विल्यम्स अंतराळात अडकली, अवघे २७ दिवसांचे इंधन शिल्लक

सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली, अवघे २७ दिवसांचे इंधन शिल्लक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. गेल्या १२ दिवसांपासून सुनीता आणि सहकारी बुच विल्मोर अंतराळात अडकून पडले आहेत. ते ५ जून रोजी स्टारलाइनर स्पेसक्राफ्टने अंतराळ स्थानकावर पोहचले होते आणि १३ जूनला परतणार होते. परंतु गेल्या १२ दिवसांपासून त्यांचे अंतराळामधील बिघाड इंजिनिअर दुरुस्त करु शकले नाहीत. अंतराळयान स्टारलाइनरमधील हेलियम लीक होत असल्यामुळे ते परतण्याची शक्यता देखील कमी दिसते.

बोईंग स्टारलाइनर अंतराळयानामध्ये बिघाडानंतर त्यांचे परत येणे चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले. आता नवीन तारीख दिली नाही. बोइंगचा स्टारलाइनर २५ तासांच्या उड्डाणानंतर अभियंत्यांना स्पेसशिपमधील थ्रस्टर सिस्टममध्ये पाच ठिकाणी हेलियम लीक होत असल्याचे समजले. त्यानंतर अंतराळयान परत आणण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला.

परंतु या दोघांनाही कोणताही धोका नसल्याचे नासाने म्हटले आहे. अंतराळयान सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी इंजिनिअर काम करत आहेत. अंतराळयानाची क्षमता ४५ दिवसांची आहे. त्यातील १८ दिवस झाले. आता केवळ २७ दिवस राहिले आहेत. नासाचे हे दुसरे अंतळायान आहे. हे पहिल्यांदाच अंतराळात गेले आहे. नासासोबत बोइंगने ४.५ अब्ज डॉलरचा करार केला आहे. त्यातील १.५ अब्ज डॉलर खर्च झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR