27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयराहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते

राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी हे लोकसभेत विरोधी पक्षनेते असणार, अशी घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे. इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षनेता कोण असणार? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर राहुल गांधी हेच विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत घोषणा केली. राहुल गांधी हे लोकसभेत विरोधकांची बाजू कणखरपणे मांडणार आहेत. विशेष म्हणजे गेल्या १० वर्षांपासून पुरेशा जागा न मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेता लोकसभेत नव्हता. पण आता इंडिया आघाडीला देखील चांगल्या जागांवर यश मिळाल्यामुळे आता विरोधकांच्या बाजूने विरोधी पक्षनेता असणार आहे. याआधी पार पडलेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांनंतर नियमानुसार लोकसभेत विरोधी पक्षनेता हे पद कुणाला मिळाले नव्हते. त्यामुळे विरोधकांची बाजू प्रखरपणे मांडण्यात विरोधक कुठेतरी कमी पडत आहेत, अशी चर्चा नेहमी व्हायची. पण आता तसे होणार नाही. कारण आता इंडिया आघाडीच्या २४० पेक्षा जास्त जागा जिंकून आल्या आहेत.

काँग्रेसने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केवळ ४४ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ च्या लोकसभेत ५२ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतापदापासून लांब राहावे लागले. पण यावेळी काँग्रेसला ९९ जागांवर यश मिळाले आहे. तसेच सांगलीच्या अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या १०० जागा आहेत. त्यामुळे यावेळी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले आहे. इंडिया आघाडीकडून या निवडणुकीत कुणाला विरोधी पक्षनेता म्हणून संधी दिली जाईल? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेता पदासाठी निवड झाल्याची माहिती मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR