जालना : प्रतिनिधी
छगन भुजबळ यांना राज्यात मराठा-ओबीसीमध्ये वाद लावून दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने दिलेल्या १३ तारखेपर्यंत गप्प रहा, खेड्यापाड्यात दंगली घडवण्याच्या नेत्यांच्या डावाला बळी पडू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
वेळ पडली तर पुन्हा मुंबईत मोर्चा काढू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. तर छगन भुजबळ यांना राज्यात मराठा-ओबीसीमध्ये वाद लावून दंगली घडवायच्या आहेत, असा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने दिलेल्या १३ तारखेपर्यंत गप्प रहा, खेड्यापाड्यात दंगली घडवण्याच्या नेत्यांच्या डावाला बळी पडू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासह इतर गावक-यांना केले आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे अंतरवाली सराटी या गावात आले आहेत. आम्हाला परवानगी नाकारून छगन भुजबळांच्या दबावाला बळी पडून इतरांना परवानगी दिली गेली, अशा घटनांचा तपशील देत जरांगे पाटील यांनी दंगलीच्या कटकारस्थानापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.