नवी दिल्ली : जुलैमध्ये होणा-या पॅरिस ऑलिम्पिकसाठी आज भारताच्या हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. १६ सदस्यीय हॉकी संघात यावेळी ५ नवीन खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहेत. तर हरमनप्रीत सिंग पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २६ जुलैपासून सुरू होत असून, ११ ऑगस्टला संपणार आहेत.
हॉकी संघाची घोषणा झाल्यानंतर संघाचे प्रशिक्षक म्हणाले की, पॅरिस ऑलिम्पिकसाठी यावेळी खेळाडूंची निवड करणे खूप कठीण होते, कारण आमच्याकडे प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. मला विश्वास आहे की संघात निवडलेले सर्व खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करतील. यावेळी संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला मेळ आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाला पूल-बीमध्ये स्थान देण्यात आले आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यासाठी अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवावे लागेल.
भारतीय हॉकी संघाचे वेळापत्रक
दिनांक संघ
२७ जुलै भारत विरुद्ध न्यूझिलंड
२९ जुलै भारत विरुद्ध अर्जेंटिना
३० जुलै भारत विरुद्ध आयर्लंड
१ ऑगस्ट भारत विरुद्ध बेल्जियम
२ ऑगस्ट भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
हे ५ खेळाडू करतील पदार्पण
१. जर्मनप्रीत सिंग
२. संजय
३. राजकुमार पाल
४. अभिषेक
५. सुखजित सिंग
पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ
हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हार्दिक सिंग (उपकर्णधार), पी. आर. श्रीजेश (गोलकीपर), मनप्रीत सिंग (मिडफिल्डर), जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित आणि संजय, राजकुमार पाल, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, अभिषेक, सुखजीत सिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग आणि गुरजंत सिंग.