मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्याकडे असलेल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्य सरकारमध्ये संदिपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मात्र आता ते छत्रपती संभाजीनगरचे खासदार झाल्याने त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदिपान भुमरे यांचा राजीनामा स्वीकारून राज्यपाल रमेश बैस यांना पाठवला. राज्यपालांनी देखील भुमरेंचा राजीनामा स्वीकारला आहे.
संदिपान भुमरे यांनी खासदार झाल्यानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खाते होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदिपान भुमरे यांचा राजीनामा स्वीकारून राज्यपाल रमेश बैस यांना पाठवला. राज्यपालांनी देखील भुमरेंचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान त्यानंतर आता या खात्याची जबाबदारी मुखमंत्र्यांनी अधिवेशन काळापूर्वी मंत्री दादा भुसे यांच्याकडे सोपवली आहे.
भुमरे यांना शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे तिकिट देण्यात आले होते. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हे या निवडणुकीच्या रिंगणात होते. एमआयएमकडून पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी निवडणूक झाल्याचे पाहायला मिळाले.अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये संदिपान भुमरे यांनी बाजी मारली.