होशियारपूर : पंजाबमधील होशियारपूरमधील तांडा रोडवरील अड्डा सरनजवळ एक भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकची जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, त्यांना सकाळी अड्डा सरण, तांडा येथील पेट्रोल पंपाजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली. ज्यामध्ये कारमध्ये प्रवास करणा-या एक बालक, दोन पुरुष आणि एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
कारमधील लोक तांडाहून पीजीआय चंदिगडला जात होते, तर ट्रक होशियारपूरहून तांडाकडे जात असताना अड्डा सरनजवळ दोघांची जोरदार धडक झाली. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याला अमृतसर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस प्रशासनाकडून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात असून, पुढील तपास सुरू आहे.