गाझा : गाझा पट्टीत गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान ४० पॅलेस्टिनी ठार तर २२४ जण जखमी झाले आहेत.
गाझामधील आरोग्य अधिका-यांनी शनिवारी सांगितले की पॅलेस्टिनी मृतांची एकूण संख्या आता ३७,८३४ वर पोहोचली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये पॅलेस्टिनी-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून ८६,८५८ लोक जखमी झाले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, इस्रायली सैन्य आणि पॅलेस्टिनी सशस्त्र गट यांच्यातील संघर्षामुळे बचाव पथकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते अवीचय अद्राई यांनी शनिवारी एका पत्रकार निवेदनात सांगितले की, इस्रायली सैन्याने शुजैया भागातील दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. गेल्या काही तासांत झालेल्या चकमकींमध्ये लष्कराने अनेकांना ठार केले आणि इस्त्रायली सैन्याला या भागातील शाळेच्या आवारात शस्त्रसाठा सापडल्याचे त्यांनी सांगितले. अद्राईच्या म्हणण्यानुसार, रफाहमध्ये इस्रायली सैन्याने अनेक दहशतवाद्यांना ठार केले आणि बोगद्यांसह अनेक दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत.