बीड : बीडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बीडमध्ये गोळीबार झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर बीडमध्ये खळबळ उडाली आहे. जखमी व्यक्तीवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बीडच्या परळीत शनिवारी रात्री गोळीबार झाला. यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे जागीच ठार झाले आहेत. तर, ग्यानबा गित्ते गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील बँक कॉलनीत ही घटना घडली आहे. गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली. सध्या ते परळीत ठाण मांडून आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, गोळीबारानंतर परळीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत बापू आंधळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळत आहे.
सल्याचेही त्यांनी सांगितले.