24.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रतर मुंबईत दुसरे हाथरस घडले असते

तर मुंबईत दुसरे हाथरस घडले असते

टीम इंडियाच्या मिरवणुकीवर सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया

मुंबई : विजयी भारतीय क्रिकेट टीमची मुंबईमध्ये भव्य मिरवणूक झाली. यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. चाहते इतक्या मोठ्या संख्येने आले होते की, काही ठिकाणी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काही जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि आमदार सत्यजित तांबे यांनी या सर्व प्रकारावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईमध्ये हाथरससारखी घटना घडली नाही, याबाबत देवाचे आभार. फर्स्ट कम, फर्स्ट सीट अशा प्रकारची सुविधा वानखेडेवर करण्यात आली होती. प्रशासनाकडून हे किती बेजबाबदार प्रकारचे नियोजन होतं. इतकी मोठी रिस्क प्रशासनाने कशी घेतली? काहीच दिवसांपूर्वी हाथरसमधील चेंगराचेंगरी’ १२१ लोक मृत्युमुखी पडलेत, हे प्रशासन विसरले का? असा सवाल तांबे यांनी केला आहे. हे देशाबाबत किंवा क्रिकेट टीमबाबत प्रेम नाही तर हा शुद्ध वेडेपणा आहे. गोंधळ आणि बेजबाबदारपणा पेक्षा सुरक्षा आणि शहाणपणाला जास्त महत्त्व द्या, असं तांबे म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.
गर्दीच्या नियोजनात प्रशासन अपयशी

अनपेक्षित गर्दी झाल्यामुळे आणि ढिसाळ सुरक्षा नियोजनामुळे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती.गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले.

मिरवणुकीला उशीर
टी-२० वर्ल्डकप जिंकून चार दिवस झाले. त्यामुळे विजय मिरवणुकीची तयारी अगोदर होणे अपेक्षित होते; मात्र ढिसाळ नियोजनामुळे चर्चगेट ते नरिमन पॉईंटदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासनाला अपयश आले. अनेक ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा परिस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे पाच वाजता ठरलेल्या मिरवणुकीला दोन तास उशीर झाला.

मुख्यमंत्र्यांचा फोन
क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरिमन पॉईंट ते स्टेडियमदरम्यान, मरीन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतूक विस्कळित होऊ नये; तसेच जमलेल्या क्रिकेटप्रेमींना कोणताही त्रास होऊ नये, याकडे मुंबई पोलिस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, आनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंर्त्यांनी दूरध्वनीद्वारे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR