24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरआम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून

आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून

मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?

वडीगोद्री : आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह अंतरवाली सराटीमधील सर्व गुन्हे मागे घेतील असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच राजकीय इच्छाशक्ती असेल तर ७ दिवस नाही, २ तासांत कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. मराठवाडा दौ-यावर जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे मराठवाडा दौ-यासाठी अंतरवाली सराटीतून आज सकाळी ७:१५ वाजता रवाना झाले आहेत. मनोज जरांगे हिंगोली दौ-यावर असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज मराठा समाजाची महाएल्गार शांतता रॅली निघणार आहे. एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असेत, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

मराठा समाजाची बैठक घेतल्याशिवाय पुढचा निर्णय होणार नसल्याचे जरांगे यांनी १३ तारखेनंतर पुढची दिशा काय या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. छगन भुजबळ त्यांच्या लोकांना सांगून, त्यांना पदांचे आमिष दाखवून आमच्या मराठा सामजाच्या शांतता रॅलीत काही करायला लावतील असा संशय जरांगे यांनी व्यक्त केला. जर आमच्या शांतता रॅलीत काही झाले तर त्याला छगन भुजबळ आणि सरकार जबाबदार राहील असे जरांगे म्हणाले. मोठ्या वाहनांचा ताफा घेऊन जरांगे हे अंतरवाली सराटीतून मराठवाडा दौ-यावर रवाना झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR