लंडन : प्रतिनिधी
ब्रिटनमध्ये गुरुवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर झाले असून, लेबर पार्टीने ६५० पैकी तब्बल ४१२ जागांवर विजय मिळवित ४०० पारचा आकडा पार केला. लेबर पाटीचे किएर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली आणि त्यांनी देशात सत्तांतर घडवून आणले. या निवडणुकीत मूळ भारतीय खासदारांचाही बोलबाला पाहायला मिळाला. कारण यामध्ये तब्बल २९ मूळ भारतीय खासदार निवडून आले. त्यामध्ये सर्वाधिक १९ मूळ भारतीय खासदार हे लेबर पार्टीचे आहेत. तसेच कंझरवेटिव्ह पक्षाचे ७, लिबरल डेमॉक्रॅटिकचे १ आणि २ अपक्ष उमेदवार निवडून आले.
या निवडणुकीत मूळ भारतीय असलेल्या २९ जणांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे ब्रिटनच्या संसदेत मूळ भारतीय असलेले २९ खासदार पोहोचले आहेत. त्यामुळे ब्रिटनच्या संसदेत मूळ भारतीयांचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या अगोदरही २९ मूळ भारतीय खासदार होते. यावेळी लेबर पार्टीमधून १९ मूळ भारतीयांनी विजय मिळविला. त्यामुळे हे खासदार हाऊस ऑफ कॉमन्सचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यासोबतच कंझरवेटिव्ह पक्षाकडून ७ मूळ भारतीयांनी विजय मिळविला. तसेच लिबरल डेमॉक्रॅटिकस पक्षातून १ आणि २ मूळ भारतीय अपक्ष निवडून आले आहेत.
हे आहेत मूळ भारतीय खासदार
सीमा मल्होत्रा, वॅलेरी वाज, लिसा नंदी, नवेंदू मिश्रा, नाडिया विटकोम, तनमनजीतसिंह ढेसी, प्रीत कौर गिल, बॅगी शंकर, गुरिंदरसिंह जोसन, हरप्रीत उप्पल, जस अठवाल, जीवन संधेर, कनिष्का नारायण, सतवीर कौर, सुरीना ब्रेकेनब्रीज यांच्यासह कंझरवेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक, गगन मोहिन्द्रा, शिवानी राजा, सुएला ब्रेवरमॅन, प्रीती पटेल, क्लेयर कॉटिन्हो यांचा समावेश आहे.