23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रदोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये असणा-यांना योजनेचा लाभ देऊ नका

दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये असणा-यांना योजनेचा लाभ देऊ नका

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान या योजनेवरुन राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे केले जात असताना या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्या पाठोपाठ आता विश्व हिंदू परिषदने देखील नवी मागणी केली आहे. ज्यांना दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांना ‘लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई-गोवा प्रदेश प्रमुख गोंिवद शेंडे यांनी केली आहे. नागपुरात ते शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे.

लोकसंख्या नियंत्रित करायची असेल तर या योजनेत बदल करा. या संदर्भात भाष्य करताना गोंिवद शेंडे म्हणाले की, महिलांना या योजनेचा लाभ होणार असला तरी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सरकारने या योजनेवर बंधन घालणे आवश्यक आहे. काही समाजाचे लोक ज्यांना दोन पत्नी आहेत, तसेच 6 मुले आहेत, त्यांना जास्त फायदा होईल आणि ज्याची एक पत्नी आहे, एक मूल आहे त्याला कमी फायदा होईल. त्यामुळे सरकारने काही अटींचा या योजनेत समावेश केला पाहिजे. असे केल्याने केवळ ख-या लाभार्थ्यांना फायदा होऊ शकेल. अशी विश्व हिंदू परिषदेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. हा राष्ट्रहिताचा विषय आहे. यात धार्मिक भावना आणू नये. लोकसंख्या नियंत्रित करायची असेल सरकारने या योजनेत बदल करण्याची गरज आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिणार आहोत, असेही गोविंद शेंडे यांनी बोलताना सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR