28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीवर आघाडीचा दुहेरी मार

महायुतीवर आघाडीचा दुहेरी मार

उद्धव ठाकरेंचा भाजपला तर शरद पवारांचा अजित पवारांना झटका महाविकास आघाडीत इनकमिंग सुरू

मुंबई : राज्यातील राजकारणात रविवारी दोन मोठ्या घडामोडी झाल्या असून लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाले आहे. यातच छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरेंनी भाजपला धक्का दिला असून नाशिकमध्ये शरद पवार अजित पवार यांना धक्का दिला आहे.

या दोन्ही ठिकाणाचे बडे पदाधिकारी पक्ष सोडून नवीन ठिकाणी गेले आहेत. अजित पवार गटाला नाशिकमध्ये शरद पवार गटाचा धक्का आहे. नाशिकचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले यांनी रविवार दि. ७ जुलै रोजी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत १०० पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना नाशिक जिल्ह्यात हा मोठा धक्का आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या.

शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या. परंतु अजित गटाला एकच जागा मिळाली. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना भाजपने उमेदवारीसाठी झुलवत ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत मोठ्या अपेक्षेने गेलो होतो. मात्र लोकांची काम होत नव्हती. त्यामुळे आज पुन्हा शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

छत्रपती संभाजीनगरात भाजपला धक्का
शरद पवार नाशिकमध्ये अजित पवार यांना धक्का देत असताना छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का दिला आहे. भाजप नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे भाजपसोडून शिवसेनेत गेले आहेत. त्यांच्यासोबत ६ नगरसेवकही शिवसेनेत गेले आहेत. तसेच अनेक पदाधिकारी आहे. गोकुळ मलके (नगरसेवक भाजप), प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप), अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी), प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष), रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) हे शिवसेनेत जात आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपयश आहे. महाविकास आघाडीची कामगिरी चांगली झाली. भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या. काँग्रेस १३ जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने ९ जागा जिंकल्या. तर शिंदे गटाने ७ जागा जिंकल्या. अजित पवार गटाला केवळ एक जागा मिळाली. परंतु शरद पवार गटाने दहा जागा लढवत आठ ठिकाणी विजय मिळवला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR