23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रबांगलादेशी घुसखोरांचा उच्छाद

बांगलादेशी घुसखोरांचा उच्छाद

पिंपरी चिंचवडमध्ये बनावटगिरीचे प्रमाण वाढले तब्बल ४२ भारतीय पासपोर्ट रद्द

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पासपोर्ट विभागाकडून अनधिकृत राहत असलेल्या बांगलादेशींकडून बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवलेले तब्बल ४२ भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. पिंपरीचिंचवड शहरातील दहशतवाद विरोधी पथक आणि निगडी पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत जानेवारी महिन्यात निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनाधिकृरित्या वास्तव्य करत असणा-या ५ बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती मिळाली होती.

यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्या ५ बांगलादेशी नागरिकांना ज्या एजंटने पासपोर्ट बनवण्यासाठी मदत केली त्याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात आली. यामद्ये त्या एजंटने आणखी ३५ बांगलादेशी घुसखोरांना भारतीय पासपोर्ट मिळवून दिला असल्याचे समोर आले आहे. संबंधित एजंटसह सर्व ४२ बांगलादेशी घुसखोरांविरोधात जानेवारी महिन्यात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शोध घेतला असता त्या ५ बांगलादेशी नागरिकांना एका एजंटने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट बनवून दिला असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथक, निगडी पोलिस पासपोर्ट विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये ज्या एजंटकडून हे पासपोर्ट बनवले गेले ते ४२ पासपोर्ट रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.

कसे बनवितात पासपोर्ट?
हे घुसखोर भारत-बांगलादेश बॉर्डरवरून भारतात प्रवेश केल्यानंतर ते त्या ठिकाणी असणा-या बॉर्डरवर असणा-या जिल्ह्यातील बनावट शाळा सोडल्याचा दाखला, डोमीसाईल इत्यादी कागदपत्रे बनवत आणि त्या कागदपत्राच्या आधारे ओरिजनल आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेत आणि त्यानंतर ते घुसखोर या ओरिजनल आधारकार्ड आणि पॅनकार्डच्या आधारावर पासपोर्ट बनवून घेत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR