23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeधाराशिवपवनचक्कीचे लाखो रूपये किंमतीचे कॉपर वायर चोरणा-यास अटक

पवनचक्कीचे लाखो रूपये किंमतीचे कॉपर वायर चोरणा-यास अटक

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात विविध नामांकित कंपनीच्या वतीने पवनचक्कीची मोठ्या प्रमाणात उभारणी केलेली असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवन उर्जा निर्माण होत आहे. चोरट्यांच्या टोळीने वाशी तालुक्यातील विविध गावातील पवनचक्कीचे लाखो रूपये किंमतीचे कॉपर वायर लंपास केले होते. या प्रकरणी वाशीसह अन्य पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. ६ जुलै रोजी उंबरा पारधी पेढी (ता. वाशी) येथून एकाल चोरट्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीचे २ लाख १२ हजार रूपये किंमतीचे कॉपर वायर जप्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोहेकॉ श्री. काझी, पोहेकॉ श्री. पठाण, पोहेकॉ श्री. औताडे, चालक पोअं श्री. भोसले यांचे पथक दि. ६ जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पेट्रोलींग करीत होते. हे पथक येरमाळा येथील उडाणपुल येथे आले होते. त्यावेळी पथकास पवनचक्कीचे कॉपर वायर चोरणारा उंबरा पारधी पेढी येथे असल्याची व त्याच्या घरी चोरीचा माल असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती.

पथकाने उंबरा येथे जाऊन संशयित आरोपी अनिल उर्फ बापू दत्ता पवार घराची पाहणी केली. त्याला ताब्यात घेऊन त्याच्या घराच्या पाठीमागे पोत्यात कॉपर वायर मिळून आली. कॉपर वायर बाबत त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितले की, मी व माझ्या सोबत अन्य १० ते १५ लोकांनी मिळून मागील वर्षी व चालू वर्षात यसवंडी, घाटपिंप्री, सारोळा, तसेच घाटनांदूर या शिवारातील पवनचक्कीचे कॉपर वायरच्या चो-या केल्या आहेत. त्या चोरीतील माझे वाटणीला आलेली वायर आहे, असे सांगितले.

त्याच्या सांगण्यावरून पथकाने गुन्हे अभिलेखाची पाहणी केली असता सदर कॉपर वायर चोरीबाबत पोलीस ठाणे वाशी येथे विविध कलमाखाली पाच गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. पथकाने आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील कॉपर वायर एकुण २ लाख १२ हजार रूपये किंमतीचे जप्त करुन पुढील कार्यवाही कामी आरोपीस वाशी पोलीसांच्या ताब्यात दिले. इतर आरोपींचा व मुद्देमालाचा शोध सुरु आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR