27.3 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रअरुण गवळी संदर्भातील कागदपत्रे गहाळ?

अरुण गवळी संदर्भातील कागदपत्रे गहाळ?

मुंबई : खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण गवळी संदर्भातील काही कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुण गवळी याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ऍक्ट (मोक्का) लागू करण्यासंदर्भात कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती शुक्रवारी क्राईम ब्रँचच्या अधिका-यांनी मुंबई सत्र न्यायालयात मोक्का कोर्टात दिली. शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे. कथित खंडणी, आर्थिक लाभ आणि २००५ मध्ये मुंबई, ठाणे आणि कल्याणधील मालमत्ता हडप करण्यासाठी काहींना धमक्या दिल्याचा आरोप अरुण गवळी आणि त्याच्या टोळीतील काही जणांवर आहे.

खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी गवळीच्या वकिलांना कागपदत्रांची मागणी केली होती. पण, विशेष सरकारी वकिलांनी २०१३ मध्ये मुंबईत पूर आला असताना ठेवलेली कागदपत्रे सापडत नसल्याचे न्यायालयात म्हटले. न्यायालयाने गेल्याच महिन्यात पोलिसांना कागदपत्रांवरून खडसावले होते. अस्पष्ट विधान मान्य केली जाणार नाहीत असे म्हटले होते. दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही. त्यामुळे कागदपत्रे सादर करण्यास किती वेळ लागेल? ते सांगा, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांना सुनावले होते.

काय आहे नेमके प्रकरण?
मुंबईतील एका बिल्डरला २००५ मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते. त्यात राम श्याम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी ५० लाख रूपयांची मागणी केली होती. त्यासह बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितले होते. नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी, धमकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR