लातूर : प्रतिनिधी
येथे आज दि. ९ जुलै रोजी होणा-या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या पर्शवभूमीवर लातूर शहरात सोमवारी सकाळी ११ वाजता मोटार रॅली काढण्यात आली. औसा रोडवरील शासकीय विश्रामगृहापासून ती मार्गस्थ झाली. यावेळी आरक्षण समर्थनार्थ युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी विवेकानंद चौक, छत्रपती शाहु महाराज चौक, जूने गुळ मार्केट, महात्मा बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक असा रॅलीचा मार्ग होता.