28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरसंत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन

संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन

सोलापूर : प्रतिनिधी
पंढरीच्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी श्रीक्षेत्र शेगांव येथून आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्याने आज दुपारी सायंकाळ साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाकूर, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी पोलीस अधिकारी व मान्यवरांनी पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले.या पालखीत जवळपास सातशे वारकरी सहभागी झाले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातून ही पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर या पालखीचे स्वागत करण्यात आले.आज पालखीचा मुक्काम उळेगावात आहे. येथे रात्री किर्तन, पूजा व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्या नंतर उद्या बुधवार 10 जुलै रोजी पहाटे ही पालखी सोलापूर शहरात दाखल होणार आहे. हा पालखी सोहळा दोन दिवसासाठी सोलापुरात मुक्कामी असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR