24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूरभाजपकडून जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न : खा. शिंदे

भाजपकडून जातीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न : खा. शिंदे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी योगी आले, मोदी आले, पण कोणी टिकले नाही. निवडणूक हातची गेल्याचे लक्षात आल्याने भाजपने जातीय ध्रुवीकरण करीत मत मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ही निवडणूक लोकांनी हाती घेतली. लोकशाहीची खरी निवडणूक झाली. त्यामुळे विरोधकांची डाळ शिजली नाही, असा हल्लाबोल खा. प्रणिती शिंदे यांनी केला.

शहर उत्तर आणि मध्य विधानसभा मतदारसंघात अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिरात महाविकास आघाडीचा कृतज्ञता मेळावा झाला. यावेळी मतदार आणि सर्व पक्षांचे आभार मानत भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे, धर्मराज काडादी, चेतन नरोटे, प्रकाश यलगुलवार, माजी आ. नरसय्या आडम, दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर महेश कोठे, संजय हेमगड्डी, अस्मिता गायकवाड उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातूनविधानसभा निवडणुकीच्या तयारीचा निर्धार करण्यात आला.

अयोध्येमध्येही भाजप निवडून येऊ शकला नाही. त्यामुळे जात-पातीच्यामुद्यांवर निवडणूक होत नाही. विधानसभा निवडणुकीचा पॅटर्न वेगळा असतो. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुका एकत्रलढल्या जाणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागण्याचा सूर या मेळाव्यात निघाला.

खा. प्रणिती शिंदे यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. खा. शिंदे पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीत काही लोक विरोधकांना मॅनेज झाले होते. विरोधकांकडे गेल्याच्या गोष्टीदेखील कानावर आल्या, मात्र आता विधानसभा निवडणूक आहे. भाजपला बळी पडू नका.काही लोकं मॅनेज होऊन त्यांच्याकडे गेल्याच्या गाष्टीदेखील कानावर आल्या पण आता विधानसभा निवडणुका आहेत, भाजपला बळी पडू नका. यावेळी प्रकाश यलगुलवार, आडम मास्तर, चेतन नरोटे धर्मराज काडादी यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांची भाषणे झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR