सोलापूर : जिल्ह्यात डायरिया या आजाराचे प्रमाण वाढू नये, यासाठी डायरिया अभियान जिल् यात प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी त्यांनी अतिसार थांबवा (स्टॉप डायरिया) या विशेष अभियान आणि स्टिकरचा शुभारंभ केला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या दालनात डायरिया अभियान, स्टिकरचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, अमोल जाधव, सुनिल कटकोंड, सचिन सोनकांबळे, सचिनजाधव, सचिन सोनवणे, शंकर बंडगर उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान अतिसार थांबवा अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे.