17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरलातूरातील नीट प्रकरणातली मुख्य सुत्रधार एन.गंगाधरला अटक

लातूरातील नीट प्रकरणातली मुख्य सुत्रधार एन.गंगाधरला अटक

लातूर : विनोद उगीले
नीट २०२४ पेपरफुटी प्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सीबीआयने या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या एन. गंगाधरप्पा ननजूडप्पा यास सोमवारी अटक केली असून त्याला लातूरात न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे. एन गंगाधरप्पा ननजूडप्पा याच्या अटकेमुळे या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
मागच्या महिन्यात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नांदेड एटीएसने दाखल केलेल्या गुन्ह्याचा सुरवातीला नांदेड एटीएस त्यानंतर लातूर पोलीसांनी तपास केल्यानंतर देशभरात चर्चेला आलेल्या या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करीत आहे. सीबीआयच्या कोठडीतील शिक्षक असलेले संशयीत आरोपी जलीलखाँ पठाण व संजय तुकाराम जाधव याची ही न्यायालीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर सीबीआय आता यापुढे या तपासात काय करणार याकडेच सर्वांचेच लक्ष लागले होते.
सोमवार नंतर सीबीआयने लातूरातील आपला मुक्काम वाढवत सोमवारी सीबीआयच्या पथकाने या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार असलेल्या एन. गंगाधरप्पा ननजूडप्पा यास बेंगरुळू येथून ताब्यात घेऊन लातूरात आणले असून या बहुचर्चित प्रकरणी सोमवारी सीबीआयने त्याला अटक दाखवून लातूरच्या न्यायालया समोर हजर करुन  पुढील तपास कामी दोन दिवसाची सीबीआय कोठडी द्यावी अशी न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने सीबीआयची ही विनंती मान्य करत एन. गंगाधरप्पा ननजूडप्पा यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून एन. गंगाधरप्पा ननजूडप्पा याचे अटकेमुळे या प्रकरणाचा ख-या अर्थाने आता उलगडा होणार आहे.
एन. गंगाधरला उच्च रक्तदाब लातूरातील दाखल नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या कोठडीत असलेल्या एन. गंगाधरप्पा ननजूडप्पा यास उच्च रक्तदाब असून सीबीआयच्या अटकेनंतर त्याला लातूरात आणल्यानंतर त्याला याचा त्रास जाणवू लागल्यानंतर सीबीआयने त्याला उपचारासाठी लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रूग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर सीबीआयने त्याला न्यायालयासमोर हजर केले.
तपासात संशयीत आरोपीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
लातूरात दाखल गुन्ह्यातील अटकेत असलेल्या आरोपींचे ऐकमेकांशी संबध आहेत हे तपासातून निष्पन्न झाले आहे. असे असले तरी ते सीबीआय तपासात विभन्न माहीती देऊन सीबीआयची दिशाभून करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सीबीआय न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी व एन. गंगाधर यांची समोरासमोर चौकशी करण्याची शक्यता आहे.
इरान्ना कोंगुलवारचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज !
याप्रकरणातील फरार असलेला तिसरा आरोपी इरान्ना मष्णाजी कोंगुलवार याने अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू केले असून लातूरच्या न्यायालयात त्याच्या वकीलानं अर्ज केल्याची माहिती समोर येत आहे.आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR