मुंबई : महिलांनी महाविकास आघाडीच्या शिबिरात अर्ज करु नये. कारण, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. महिलांचे अर्ज बाद करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट आहे. अॅप, सेतू केंद्र किंवा पोर्टलवर स्वत: अर्ज भरण्याचे आवाहन वाघ यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिबीरात महिलांनी अर्ज करु नये. कारण, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांना फसवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रयत्न असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. अर्जात त्रुटी ठेवत सरकारला बदनाम करण्याचा विरोधकांचा कट असल्याचे वाघ म्हणाल्या.
पैसे कधी जमा होणार?
लाडकी बहीण योजनेचे पैसे १४ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या १५ तारखेला महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपयांची रक्कम जमा होईल.