22.2 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeमनोरंजनमुन्ना भैय्याच्या एन्ट्रीचा मार्ग मोकळा!

मुन्ना भैय्याच्या एन्ट्रीचा मार्ग मोकळा!

मुंबई : सध्या ओटीटीवर एका सिरिजची बरीच चर्चा सुरु आहे. मिर्झापूर सिझन ३ हा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. मागील चार वर्षांपासून प्रेक्षक या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. पण या सिझनचे कथानक काहीसे प्रेक्षकांना पसंतीस पडलं नसल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे मुन्ना भैय्या नसल्यामुळे अनेकांनी या सिरिजवर नाराजी व्यक्त केली आहे.

या सिझनमध्ये प्रेक्षकांनी मुन्ना भैय्याला सर्वात जास्त मिस केलं. कालिन भैय्यानंतर मुन्ना भैय्या देखील या मालिकेतील महत्त्वाचा भाग होता. नुकतच अली फजलने मिर्झापूरच्या चौथ्या सिझनविषयी अपडेट दिले आहेत. अशाच परिस्थितीमध्ये पुढच्या सिझनमध्ये मुन्ना भैय्याचा प्रवेश कसा होईल, याबाबत चाहते फार उत्सुक आहे. मिर्झापूर सीझन ३ च्या पहिल्याच सीनमध्ये जेव्हा मुन्ना भैय्याचा मृतदेह आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार दाखवण्यात आले तेव्हा चाहत्यांना फार वाईट वाटले. त्यामुळे तिस-या सिझनमध्ये मुन्ना भैय्या दिसणार नाही हे स्पष्ट झाले. मुन्ना भैय्याचे पात्र संपवल्यामुळे लोकांना तिसरा सिझन बघावासा वाटला नाही, असेही अनेकजण म्हणत आहे. त्यामुळे आता चाहत्यांनी अनेक आयडिया सांगितल्या आहेत, ज्यामुळे मुन्ना भैय्याची सिझनमध्ये पुन्हा एन्ट्री होऊ शकते.

अशी होऊ शकते मु्न्ना भैय्याची एन्ट्री
मुन्ना भैय्याच्या एन्ट्रीसाठी एकाने आयडिया देत म्हटले की, चौथ्या सिझनमध्ये कालिन भैय्याची बायको बिना भाभी आणि तिचा मुलगा म्हणून मुन्ना भैय्या चौथ्या सिझनमध्ये दिसू शकतो. त्यामुळे चौथ्या सिझनमध्ये बिना भाभाच्या मुलाच्या भूमिकेत मुन्ना भैय्या दिसू शकतो.

मिर्झापूरचा चौथा सीझन येणार?
चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झालेल्या मिर्झापूरच्या या सीझनला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांना ही सीरीज आवडली आहे, तर अनेक चाहत्यांच्या ती पचनी पडलेली नाही. काही प्रेक्षकांच्या मते, मागील दोन सीझनच्या तुलनेत तिसरा सीझन खास नाही. पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल आणि श्वेता त्रिपाठी यांच्या दमदार भूमिका असूनही, ज्यांनी मिर्झापूर ३ पाहिला आहे त्यांना आता चौथ्या सीझनची वाट पाहावी लागणार असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR