22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यातील ४९ शाळा ठरवल्या अनधिकृत

पुण्यातील ४९ शाळा ठरवल्या अनधिकृत

१ महिन्याने शिक्षण विभागाला जाग पालकांच्या डोक्याला ताप

पुणे : शाळा सुरू होऊन महिना होत आला असताना खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. पुणे, ंिपपरीसह जिल्ह्यात तब्बल ४९ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या शाळांमध्ये जर मुलांनी प्रवेश घेतला असेल तर त्यांच्या पुढील भवितव्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न पडला आहे. एप्रिल-मे महिन्यामध्ये अनधिकृत शाळांची यादी जाहीर करणे आवश्यक आहे. जेणेकरून पालकांची फसवणूक होणार नाही अन् विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही; मात्र आता शिक्षण विभागाने नवा पायंडा पाडला असून शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर अनधिकृत शाळांची यादी जाहीर करायची.

यंदा शाळा सुरू होऊन महिना होत आला तरी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली नव्हती. ज्यावेळी हा विषयच चर्चेचा होऊ लागला त्यानंतर खडबडून जागे झालेल्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली; मात्र यात मोठा घोळ आहे. यादी असणा-या अनेक शाळांचे वर्ग सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही यादी जाहीर करून शिक्षण विभागाने पालकांच्या डोक्याला ताप करून ठेवला आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यादीमध्ये अशी काही नावे आहेत की त्या शाळांची नावे वर्षानुवर्षे येत आहेत. ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत यावेळी कमी आहेत; पण प्रश्न उरतो तो खरंच उरलेल्या शाळांकडे परवानगी आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR