28.7 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशात विजेचा कहर

उत्तर प्रदेशात विजेचा कहर

२४ तासांत ३८ ठार, १० ते १२ जण जखमी
लखनौ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशात विजेने कहर केला असून, २४ तासांत वीज पडून झालेल्या विविध दुर्घटनांत ३८ जणांचा मृत्यू झाला. यात प्रतापगड येथे सर्वाधिक ११ जणांचा बळी गेला. तसेच सुलतानपूरला ७, चांदौली येथे ६, मैनपुरीत ५, प्रयागराज येथे ४, ओररिया, हाथरस, वाराणसी आणि सिद्धार्थनगर येथे प्रत्येकी १ जणाचा मृत्यू झाला. यासोबतच विजेच्या तडाख्यात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उत्तर प्रदेशात काल विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. या दरम्यान विविध ठिकाणी वीज कोसळून तब्बल ३८ लोकांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील ब-याच भागांत जनजीवन विस्कळीत झाले. प्रतापगड जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. तसेच चंदोली येथे वीज कोसळ््याने अनेकजण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

या पावसादरम्यान वीज कोसळण्याच्या ब-याच घटना घडल्या. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. यामध्ये शेतात काम करणा-या दोन चुलत भावांचा, तर सुलतानपूरमधील ७ मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. इतर ठिकाणीही शेतात काम करणा-या शेतक-यांवर वीज कोसळून बळी गेला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR