34.8 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदी शनिवारी मुंबई दौ-यावर

पंतप्रधान मोदी शनिवारी मुंबई दौ-यावर

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचे होणार उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी
राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणा-या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणा-या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दिनांक १३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

राज्यपाल रमेश बैस या सोहळ््याच्या अध्यक्षस्थानी असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय आयुष (स्वतंत्र कार्यभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. सुमारे १२.२० किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिस-या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या जुळ््या बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. याच जुळा बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे सायंकाळी ५ वाजता सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या कारणास्तव नागरिकांनी कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या दोन तास आधी कार्यक्रमस्थळी पोहोचावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR