28.5 C
Latur
Saturday, October 26, 2024
Homeमहाराष्ट्रशाही विवाह सोहळ््यासाठी २५०० कोटींचा खर्च!

शाही विवाह सोहळ््यासाठी २५०० कोटींचा खर्च!

मुंबई : प्रतिनिधी
आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा शाही विवाह सोहळा शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी मुंबईत पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ््यासाठी २५० पेक्षा जास्त नामंवत पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले असून, त्यांच्यासाठी अंबानी कुटुंबांने ३ फाल्कन-२००० जेट रेंटवर घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी १०० हून अधिक खासगी विमाने वापरली जाऊ शकतात. या सोहळ््यासाठी मुकेश अंबानींनी ३५० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २५०० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.

या शाही लग्न सोहळ््याची मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी सर्व विधी झाल्या आहेत. आतापर्यंत संगीत, हळदी, साखरपुडा, ग्रँड प्री-वेडिंग सोहळा यासारखे कार्यक्रम पार पडले. या सोहळ््यात देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. प्रसिद्ध कॅनेडियन पॉप गायक जस्टिन बीबर याने फरफॉर्म करत उपस्थित पाहुण्यांचे मनोरंजन केले.

१२ जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट विवाह बंधनात अडकणार आहेत. १३ जुलै रोजी शुभ आशीर्वादचा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत.

ग्रँड विवाह सोहळ््यानिमित्त देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांना व्यक्तीश: भेट घेत मुकेश अंबानी यांनी आमंत्रण दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

प्री-वेडिंगमध्ये १२०० पाहुणे
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी दोन प्री-वेडिंग फंक्शन्स झाले. गुजरातमधील जामनगर येथे पहिला कार्यक्रम पार पडला. ज्यामध्ये १२०० पाहुणे उपस्थित होते. मेटाचे मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स आणि इवांका ट्रम्प यांसारखे परदेशातील श्रीमंत लोकही सहभागी झाले होते. पॉप सिंगर रिहानानेही आपला परफॉर्मन्स या कार्यक्रमात केला होता. ३ दिवस चाललेल्या या प्री-वेडिंग फंक्शनला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली. दरम्यान, दुसरे प्री-वेडिंग इटली आणि फ्रान्स दरम्यानच्या क्रूझवर झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR